‘मुंबई ते औरंगाबाद बुलेट ट्रेन माझे स्वप्न ; ते नक्कीच पूर्ण करुन दाखवणार ‘ , रावसाहेब दानवेंचा विश्वास!

‘मुंबई ते औरंगाबाद बुलेट ट्रेन माझे स्वप्न ; ते नक्कीच पूर्ण करुन दाखवणार ‘ , रावसाहेब दानवेंचा विश्वास!

औरंगाबाद : मुंबई ते औरंगाबाद बुलेट ट्रेन सुरू करणे हे माझे स्वप्न आहे. मोदी सरकारचे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हि ट्रेन सुरु झाल्यास मराठवाड्याचा मोठा विकास होईल. रेल्वेच्या प्रमुख समस्या मला ठाऊक आहेत. अनेकदा रेल्वेमंत्र्यांकडे या समस्या मी घेऊन गेलो आहे. त्यामुळे आता या सर्व समस्या सोडवण्यास माझे प्राधान्य असेल. सर्वात महत्त्वाचे २०२३ पर्यत मुख्य मार्ग विद्युतीकरण करण्याचा मानस असल्याचे रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

रेल्वे मंत्री झाल्यानंतर मंगळवारी (दि.१७) सकाळी देवगिरी एक्सप्रेसने ते पहिल्यांदा औरंगाबादला आले. यावेळी औरंगाबाद रेल्वे स्थानक येथे कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. देवगिरी एक्सप्रेसध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, लवकरच विद्युतीकरण करण्याचे मोदी सरकारचे स्वप्न आहे. तसेच मुंबई ते औरंगाबाद बुलेट ट्रेन सुरू झाली तर दीड ते पावणे दोन तासांत मुंबईहून औरंगाबादला जाता येऊ शकते. तीन ते साडेतीन तासांत आपण मुंबईहून नागपूरला जाऊ शकतो.

असे जर झाले तर या भागाचा कायापालट होऊ शकतो. त्यामुळे हा प्रकल्प माझ्या मनात आहे. मुंबई-औरंगाबाद ते नागपूर या मार्गावर बुलेट ट्रेन उभारण्याचा विचार आहे. खासदार किंवा मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार रेल्वेचा मार्ग बदलत नाही. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनबाबतही मी अभ्यास केला आहे. यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

असा काही मार्ग होऊ शकतो का? यावर चर्चा केली आहे. नांदेड-मनमाड  विद्युतीकरण करणे ही मागणी देखील आहे. यावर देखील बैठक घेतली आहे. याशिवाय जळगाव-सोलापूर रेल्वे मार्गाची मागणी आहे. याशिवाय जालना-खांबगाव , जळगाव-सोलापूर मार्गाचा सर्वे झाला आहे. त्याचा अहवाल आला नाही. जशी परिस्थिती आहे तसा अहवाल द्यावा असे आदेश मी देऊन आलो असल्याची रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या