मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेतील महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनातून महत्वाच्या फायली गायब झाल्याची माहिती उघड झाली आहे. या सर्व फायली डेंटरच्या असून यात कोणाचे आर्थिक हितसंबंध आहेत का? असा सवाल भाजपाचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करणार असल्याचे म्हंटले आहे.
या प्रकरणी मिहीर कोटेचा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोटेचा म्हणाले, मलेरिया आणि डेंग्यूवरील उपाय योजनांसाठीच्या या टेंडर फायली आहे. महापौरांच्या दालनातून या फायली गायब झाल्या आहेत. १४ महिन्यात १८ वेळी याबाबत महापालिकेला रिमाइंडर देण्यात आलं. मुंबईत डेंग्यू, मलेरियाने डोकं वर काढलं आहे. तरीही या फायलींबाबतची कार्यवाही झाली नाही. एवढ्या वेळा रिमाइंडर देऊनही महापौरांच्या ऑफिसमधून फाईल गायब झाल्या आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल करणार आहे, असे कोटेचा म्हणाले.
मलेरिया आणि डेंग्युच्या टेंडरशी संबंधित या फायली होत्या. त्यामुळे या फाईल गायब होण्यामागे काही देवाण-घेवाणीच्या कारणांमुळेच तर या फायली गायब करण्यात आल्यात का? असा सवाल करत या फायली गायब करणारा महापालिकेतील वाझे कोण? असा सवालही कोटेचा यांनी उपस्थित केला आहे.
आर्थिक कारणासाठीच या फायली गायब झाल्या असाव्यात. त्याशिवाय या फायली गायब होऊच शकत नाहीत, असा आमचा संशय आहे. त्यामुळे एसीबीने तत्काळ या प्रकरणाचा तपास करायला हवा, या प्रकरणी भाजप आज आमदार मिहीर कोटेचा यांच्या नेतृत्वात एसीबीकडे तक्रार करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- निलंबन मागे घेण्यासाठी शिवसेना माफी मागणार? प्रियांका चतुर्वेदींची प्रतिक्रिया
- ‘मंत्री आहात ना, मग जा मुख्यमंत्र्यांकडे आणि सांगा त्यांना…’, सदाभाऊंचा बच्चू कडूंना सल्ला
- …म्हणून ममता बॅनर्जी घेणार आहेत शरद पवारांची भेट
- ‘उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला
- ‘चिड़िया चुग गई खेत अब पछताए का होय’, नवाब मलिकांचा फडणवीसांना टोला