नाणार प्रकल्पावरून पावसाळी अधिवेशनात शिवसेना सरकारला घेरणार

udhav thakare

मुंबई : सध्या राज्यभरात नाणार प्रश्न गाजतोय. शिवसेना आणि नारायण राणे यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. तर नाणार कोणत्याही परिस्थितीत होणारचं अशी राज्य सरकारची भूमिका आहे. दरम्यान येत्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

Loading...

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सूरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहीले आहेत. यंदाच अधिवेशन हे नागपूरला घेण्यात येणार आहे. ४ जुलै पासून या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. दरम्यान या अधिवेशनाच्या पार्शवभूमीवर काल रात्री उशिरा मातोश्रीवर शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीला परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्यासह काही आमदार उपस्थित होते.

बैठकी दरम्यान महाराष्ट्रातील प्रश्नांवर चर्चा झाली. नाणार प्रकल्पावरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. नाणार प्रश्नावरून शिवसेना सरकारला घेरण्याचा तयारीत असल्याची माहिती समोर येतीये. नाणार बाबत आमची भुमीका कायम रहाणार असून सभागृहात देखील शिवसेना आपली भूमीका मांडणार असल्याची माहिती शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी या बैठकीनंतर दिली.

मोदींच्या डर्टी पिक्चर मध्ये तुमची भूमिका काय ? विखे-पाटलांचा शिवसेनेवर हल्ला

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...