मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात २६६ अंकांची घसरण

मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज २६६ अंकांची घसरण होऊन बाजार ३१ हजार २५८ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८३ अंकांची घसरण होऊन बाजार ९ हजार ७५४ वर बंद झाला. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजार ३१ हजार ६०९ वर खुला झाला. दिवसभरात निर्देशांकाने ३१ हजार २२० चा नीचांकी, तर ३१ हजार ६४१ चा उच्चांकी स्तर गाठला. राष्ट्रीय शेअर बाजार ९ हजार ८६४ वर खुला झाला. दिवसभरात निर्देशांकाने ९ हजार ७४० चा नीचांकी, तर ९ हजार ८८४ चा उच्चांकी स्तर गाठला. मुंबई शेअर बाजाराच्या मिडकॅप निर्देशांकात १.५ टक्क्यांची घसरण झाली. स्मॉलकॅप निर्देशांकात एक टक्क्यांची घसरण झाली. वाहन, एफएमसीजी, माहिती-तंत्रज्ञान, माध्यम, धातू, औषधी, बॅंक, बांधकाम, दूरसंचार, भांडवली वस्तू, तेल व नैसर्गिक वायू आणि ऊर्जा या क्षेत्रातील बॅंका व कंपन्यांच्या समभागांत घसरण झाली.

You might also like
Comments
Loading...