नारायण राणे यांची दिल्ली वारी ; अमित शहा यांची घेणार भेट

narayan rane bjp

दिल्ली : कॉंग्रेस नेत्यांचा पाणउतारा करून कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नारायण राणे आता भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेंना पुन्हा एकदा पेव फुटला आहे. आज नारायण राणे भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट यांची दिल्ली मध्ये भेट घेणार आहेत. भाजपच्या कार्यकारणीची बैठकीनंतर ही भेट होणार आहे.

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपच्या काही नेत्यांनी विरोध केला आहे तर काहींनी आपले तोंड गप्प ठेवले आहे. अशात कॉंग्रेस सोडल्यानंतर नारायण राणे स्वतःचा पक्ष काढतात की भाजप मध्ये प्रवेश करतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.