Mumbai Rains: वडाळ्यात रस्ता खचल्याने गाड्यांचे नुकसान

वडाळ्यातील ‘दोस्ती पार्क’जवळ रस्ता खचल्याने गाड्यांचे नुकसान

टीम महाराष्ट्र देशा: मुंबई आणि परीसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने वाहतूक संथ गतीने सुरु आहे. तर झाडपडीच्या घटना देखील घडल्या आहेत. तर वडाळ्यातील अँटॉप हिल परिसरात रस्ता खचल्याने इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याने १५ गाड्यांचे नुकसान झाले आहे.

वडाळ्यातील या घटनेप्रकरणी दोस्ती बिल्डरवर गुन्हा दाखल केला आहे . दिपक गरोडिया, किसन गरोडिया राजेश शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून खोदकाम करताना दोस्ती बिल्डरने व्हायब्रेटरच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.शेजारी सुरू असलेल्या बांधकामुळे ही दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे

Comments
Loading...