मुंबईत पावसाचा कहर;पाणी साचल्याने नागरिकांचे हाल

जवळपास 30 हजार जण कार्यालयांतच अडकले

मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला अक्षरशः झोडपलं आहे. मुंबईत अनेक भागात पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे ऑफिसमध्ये गेलेल्या कर्मचाऱ्यांचा खोळंबा, जवळपास 30 हजार जण कार्यालयांतच अडकले आहेत .

मुसळधार पावसामुळे मुंबईतील दादर, सायन, परळ भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे . जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोणीही घाबरुन जाऊ नका. जे लोकांनी जिथे आहेत तिथेच राहण्याचा प्रयत्न करावा, प्रवास करु असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प, घरी जाणाऱ्यांचे हाल झालेत. कोणतेही वाहन नसल्याने घरी कसे पोहोयचे असा प्रश्न त्यांना सतावतोय.

दरम्यान महाराष्ट्रात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी पंतप्रधानांकडून मदतीची हमी देण्यात आली आहे तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही मुंबईतील पावसाबाबत मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेतली, सर्वोतपरी मदतीचं आश्वासन दिलं आहे. पावसात अडकलेल्यांसाठी सिद्धीविनायक मंदिरात राहण्याची सोय, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची माहिती

मुंबईतील पावसाची आकडेवारी –
परिसर- गेले 24 तास/ गेला एक तास
अंधेरी – 270 मिमी/ 92 मिमी
बीकेसी – 204 मिमी/ 54 मिमी
वांद्रे पश्चिम – 247 मिमी/ 52 मिमी
भांडुप – 251 मिमी/ 58 मिमी
चेंबुर – 214 मिमी/ 62 मिमी
कफ परेड – 123 मिमी/ 10 मिमी
दहिसर – 190 मिमी/ 40 मिमी
घाटकोपर पूर्व – 221 मिमी/ 61 मिमी
गोरेगाव – 193 मिमी/ 65 मिमी
परळ – 285 मिमी/ 40 मिमी
कुर्ला – 300 मिमी/ 92 मिमी

राज्यभरातील पावसाची आकडेवारी –
अकोला- 66.2 मिमी
अमरावती- 15.6 मिमी
गोंदिया- 33.8 मिमी
वर्धा- 24.6 मिमी
नागपूर- 17.4 मिमी
पुणे- 18.8 मिमी
कोल्हापूर- 34 मिमी