महापरिनिर्वाण दिनासाठी आलेल्या अनुयायांची पावसामुळे तारांबळ

Shivaji-Park

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कमध्ये आलेल्या अनुयायांची पावसामुळे तारांबळ उडाली आहे. लांबून आलेल्या अनुयायांसाठी शिवाजी पार्कमध्ये राहण्याची व्यवस्था प्रशासनाने केली होती. मात्र, कालपासून सुरु झालेल्या पावसामुळे त्यांची चांगलीच पंचाईत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काल शिवाजी पार्कमध्ये सर्वत्र चिखल झाल्यामुळे अनुयायांना जमिनीवर देखील बसता येत नव्हते. त्यामुळे दादर विभागात असलेल्या महापालिकेच्या शाळांमध्ये त्यांची राहण्यासाठी व्यवस्था केली आहे.

Loading...