युवासेनेची नाराजी दूर करण्यासाठी पूनम महाजन जाणार मातोश्रीवर

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेच्या मनधरणीसाठी भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना आता मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. युवासेनेच्या नाराजीनाट्यानंतर पुनम महाजन मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पूनम महाजन यांच्या प्रचाराच्या बॅनरवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केलीय. जोपर्यंत पूनम महाजन जाहीर माफी मागत नाहीत तोपर्यंत पूनम महाजनांचा प्रचार करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतलाय.

Loading...

आदित्य ठाकरे हे देशाचे युथ आयकॉन आहेत. त्यांचा अपमान हा आम्हा शिवसैनिकांचा अपमान आहे. त्यामुळे पूनम महाजन चूक मान्य करेपर्यंत भाजपच्या प्रचारावर बहिष्कार टाकत आहोत अशी टोकाची भूमिका युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'