समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची करडी नजर?; पुराव्यासह केला आरोप

samir wnkhgede

मुंबई :  मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी करण्यात आली. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे प्रचंड चर्चेत आले. मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

याबाबत वानखेडे बोलताना म्हणाले की, त्यांच्यावर बेकायदेशीर पद्धतीनं पाळत ठेवली जात आहे. मुंबई पोलीस दलातील काही पोलीस साध्या वेशात वानखेडेंवर पाळत ठेवत असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेटही घेतली आहे. ओशिवरा पोलीस स्थानकातील 2 पोलीस  समीर वानखेडेंच्या हालचालींवर पाळत ठेवून आहेत. समीर वानखेडेंनी यासंदर्भात तक्रार करताना एक सीसीटीव्ही फुटेजचाही आधार घेतला आहे. त्यामुळे सध्या समीर वानखेडे यांनी महाराष्ट्र पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.

नवाब मलिकांचा आरोप-

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप केले. क्रुझवरील ड्रग्स पार्टीतून पकडलेल्यांमध्ये भाजपच्या नेत्यांच्या नातलगांचा समावेश होता. मात्र त्यांना सोडून देण्यात आलं, असा आरोप मलिक यांनी केलाय. भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारती यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना एनसीबीने का सोडलं? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

एनसीबीने अटक केलेल्या तीन लोकांना भाजप नेत्यांच्या दबावामुळे सोडण्यात आलं का? समीर वानखेडे आणि दिल्लीतील तसेच राज्यातील भाजप नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याची चौकशी करण्यात यावी. समीर वानखेडे तसेच एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासावे. ही सर्व  छापेमारी बनावट आहे. या प्रकरणी केंद्राने एक समितीची स्थापना करावी आणि त्याची चौकशी करण्यात यावी, असंही नवाब मलिका म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या