1 कोटी 40 लाखाच्या नव्या नोटा जप्त

मुंबई: अंधेरी पश्चिमेच्या डी एन नगर पोलीसांनी 1 कोटीहून अधिक रकमेच्या नोटा पकडल्या आहेत. जप्त केलेल्या सर्व नोट्या नव्या आणि चलनातील आहेत.

याप्रकरणी तीन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून 1 कोटी 40 लाख रुपये जप्त केले आहेत.

अंधेरी पश्चिमेला जुहू वर्सोवा लिंक रोडला नाका नंदी पॉंइंट येथील जुहू धारा कॉम्पलेक्स येथे पोलिसांनी सायंकाळी ही कारवाई केली. एमएच-४७ एसी-५१५२ या टोयोटा कारमध्ये पैसे असल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यानंतर तपासणी करण्यात आली आणि ही रक्कम पकडण्यात आली. या गाडीतील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.