छात्र भारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

मुंबई: मुंबईत विलेपार्लेच्या भाईदास हॉलमध्ये छात्र भारतीच्या वतीने राष्ट्रीय छात्र संमेलन आयोजित केलं होत. या कार्यक्रमाला गुजरातमधील दलित नेता जिग्नेश मेवानी आणि दिल्लीतील जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद हे उपस्थित राहून राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार होते परंतु भीमा कोरेगाव दगडफेक प्रकरणानंतर राज्यात सध्या तणावाचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून, या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नाही.

छात्र भारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे, कार्यध्यक्ष संदीप आखाडे मुंबई छात्र भरतीचे अध्यक्ष सचिन बनसोडे यांना जुहू पोलिसांनी अटक केली आहे. तर राज्य्भारातुन आलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस हाकलवून लावत आहे.
विलेपार्लेच्या भाईदास हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार होता . पण आता आता भाईदास सभागृहाला पोलिस छावणीचं स्वरुप आलंय.