वर्दीत भीक मागू द्या; पोलीस शिपायाचं मुख्यमंत्री, पोलिस आयुक्तांना साकडे

मुंबई : मुंबई पोलीस दलातील ज्ञानेश्वर अहिरराव यांनी दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्याचं सांगत  ‘शासकीय गणवेशात भीक मागण्याची’ परवानगी मागितली आहे. वेतन न मिळाल्यानं आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यात आपण अपयशी ठरत आहोत. पोलीस विभागाच्या वरिष्ठ पोलीस आयुक्त दत्ता पडसलगिकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ज्ञानेश्वर अहिरराव यांनी पत्र लिहिलं आहे.

allow-me-begging-in-uniform- mumbai police

ज्ञानेश्वर अहिरराव यांची नियुक्ती वांद्रे येथील मातोश्री बंगल्यावर सुरक्षा बंदोबस्तावर आहे.   कुटुंबात आई, वडील, पत्नी व मुलगी आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी मासिक वेतन वेळेत मिळणे गरजेचे आहे परंतु वेतन वेळेत न मिळाल्याने आर्थिक कोंडी झाल्याचे ज्ञानेश्वर अहिरराव यांनी पत्रात लिहिले आहे.

या अर्जाच्या प्रती त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलिस आयुक्तांनाही पाठवल्या आहेत.