fbpx

मुंबई पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची वर्णी लागण्याची शक्यता!

मुंबई : ३० जूनला सतीश माथुर महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रमुख पदावरून सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या जागी मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची शक्यता आहे. त्यामुळे पडसलगीकर महासंचालक झाल्यानंतर मुंबईच्या आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जातेय.

पडसलगीकर ऑगस्टमध्ये सेवाज्येष्ठतेनुसार निवृत्त होत आहेत. मात्र त्यांची ३६ वर्षांची सेवा लक्षात घेता त्यांना सहा महिन्यांची मुदत वाढ देता येऊ शकते, अशी माहिती येत आहे. त्यामुळे पडसलगीकर महासंचालकपदी फेब्रुवारीपर्यंत पदभार सांभाळतील. त्यानंतर ते पद रिक्त असेल.

पडसलगीकर यांच्यानंतर ज्येष्ठतेत १९८५ च्या बॅचचे आयपीएस सुबोध जयस्वाल हे आहेत. सध्या जयस्वाल हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यासाठी त्यांना परत राज्यात बोलाण्याचा विचार सुरू आहे. मात्र जयस्वाल त्यासाठी उत्सुक नसल्याचे कळते आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील मुली सुरक्षित नाहीत – नवाब मलिक

अॅट्रॉसिटी निर्णयाला स्थगिती नाही; सुप्रीम कोर्टाने फेटाळली केंद्र सरकारची मागणी