मुंबई: राज्यातील राजकारण कुठल्या दिशेने चालले आहे हे समजायला काही मार्ग नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजरिया यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल भाजपच्या माजी नगरसेवकाने आक्षेपार्ह ट्विट केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची तुलना लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्याशी केल्या प्रकरणी जितेन गजारिया (Jiten Gajaria) याला अटक करण्यात आली होती. या प्रकारामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलेच राजकारण तापले आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका भाजप नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह ट्विट केलं आहे.
भाजपचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रे (Sandeep Mhatre) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले आहे. त्यामुळे शिवसेनेने (Shivsena) संताप व्यक्त करत संदीप म्हात्रे विरोधात पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती. त्यामुळे पोलिसांनी आता भाजपच्या (BJP) माजी नगरसेवक संदीप म्हात्रे याला अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘ती’ जागा आयुक्त पांडेय यांनी स्मार्ट सिटीला २१ कोटीत विकली; आंबेडकरवादी समितीचा आरोप!
- “बिन बुलाये पाकिस्तान्यांसोबत बिर्याणी खायला भीती नाही वाटत पण..” भाई जगताप यांचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा
- राज्यात कोरोना वाढतोय! लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंची महत्वाची माहिती
- परीक्षा घोट्याळ्यात अटक असलेल्या तुकाराम सुपेसह ११ जण कोरोना पॉझिटीव्ह
- अचानक लाहोरला उतरले तेव्हा जीवाला धोका नव्हता आणि शेतकऱ्यांमध्ये अडकले तर…
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<