‘मद्यपी आणि वाहतुकीचे अन्य नियम मोडणाऱ्या गोविंदांची गय केली जाणार नाही’

मुंबई – दरवर्षीप्रमाणे गोपाळकाला संबंध मुंबईसह देशभरात उत्साहात साजरा होत आहे. मात्र, या उत्सवाला कुठलेही गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. संबंध मुंबईत ३०३० दहीहंडी मंडळ असून ४० हजाराहून जास्त पोलिसांचा उद्या बंदोबस्त असणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली. मुंबई पोलिसांचा ४० हजारांचा ताफा सज्ज झाला आहे.

मुंबई , ठाणे आणि नवी मुंबई या विभागांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यंदा मुंबईत दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दहीहंडी फोडण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांपैकी मद्यपी आणि वाहतुकीचे अन्य नियम मोडणाऱ्या गोविंदांची गय केली जाणार नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शनिवारी स्थानिक पोलिसांसह विशेष पथकं मिळून ४० हजारांवर पोलीस रस्त्यावर असतील अशी माहिती पोलीस प्रवक्ता प्रणय अशोक यांनी सांगितलं.

यासोबतच महिलांविरोधी गुन्हे, किरकोळ कारणांवरून हाणामारी असे प्रकार टाळण्यासाठी खबरदारीचे विविध उपाय योजले आहेत. पोलीस ठाण्याचा बंदोबस्त, सशस्त्र पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बीडीडीएस, विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक पोलीस आणि होमगार्ड असा बंदोबस्त तैनात असेल.

महत्वाच्या बातम्या