मुंबई पोलिसांची ड्युटी केवळ ८ तास !

Mumbai-police--1441378213_835x547

मुंबई : मुंबई पोलिसांच्या कामाचे आता फक्त ८ तासच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी याबाबत घोषणा केली आहे. ‘मिशन ८ अवर्स’ या कार्यक्रमात पडसलगीकर यांनी ही घोषणा केली आहे.

मुंबई पोलिसांना कामाचे तास नाहीत. एकदा घरातून बाहेर पडलेला पोलीस १२ तासांनी, १६ तर कधी २४ तासांनी घरी परततो. त्यामुळे पोलिसांचे आरोग्य, मानसिकता, कौटुंबिक आयुष्य या सर्वांवर त्याचा विपरित परिणाम होतो. गेल्या वर्षाभरात मुंबई पोलीस दलातील देवनार आणि नंतर काही पोलीस स्थानकामध्ये ही ऑन ड्युटी ८ तास संकल्पना राबवण्यात आली. सुरुवातीला काही अडचणी आल्या पण त्यावर वरीष्ठ पातळीवर तोडगा काढण्यात आला आणि नंतर हा प्रयोग यशस्वी झाला.Loading…
Loading...