मुंबईकरांनी थोडा त्रास सहन करावा – माधव भंडारी

टीम महाराष्ट्र देशा : भाजपच्या स्थापना दिवसाचा जल्लोष साजरा करण्यासाठी राज्यभरातून भाजपचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलात होऊ घातलेल्या भाजपच्या महामेळाव्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून त्यामुळे मुंबईकर प्रचंड संतापले होते. या नागरिकांनी वांद्रयात भाजपा कार्यकर्त्यांच्या बस रोखून धरल्या होत्या. त्यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलीस या नागरिकांना हटविण्यासाठी त्याठिकाणी आले तेव्हादेखील बाचाबाचीचा प्रकार घडला.

या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी मुंबईकरांची माफी मागितली. मुंबईत पाच-सहा वर्षातून भाजपाचा एखादा मेळावा होतो. त्यामुळे आजच्या मेळाव्याला राज्यभरातून कार्यकर्ते आले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे, हे आम्ही मान्य करतो. त्यासाठी मी मुंबईकरांची माफी मागतो. पण त्यांनी मुंबईत येणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांचे स्वागत करावे, अशी विनंती मी करतो. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांसोबत भाजपाची अंतर्गत यंत्रणाही काम करत आहे. त्यामुळे लोकांनी आजचा दिवस आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन माधव भंडारी यांनी केले.

You might also like
Comments
Loading...