‘मुंबई पालिका खड्डे नाही तर खिसे भरते!’, भाजपची टीका

मुंबई : सध्या मुंबई मध्ये अनेक समस्या आहे. पावसामुळे मुंबई जलमय झाली आहे. अनेक दुर्घटना देखील पावसामुळे झाल्या. त्याच बरोबर नाल्यांमधील कचरा, रस्त्यात असलेले कड्डे, कचरा प्रश्न याने मुंबईकर त्रस्त झाले आहे. यावर जबाबदार कोण? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो.

कांदिवलीचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई महानगरपालिकेवर निशाना साधत सोशल मिडीयावर पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी मुंबईचे विविध प्रश्न मांडत मुंबई महानगर पालिकेचा गहाळ कारभार दाखवला आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी नाले, रस्ते, घंटा गाडी याचे काही फोटो देखील टाकले आहे. ते म्हणतात, दर दोन महिन्याला तेच खड्डे महानगरपालिका भरते, ते खड्डे नाही खिसे भरतात. नाले प्रश्नावर भातखळकर वक्तव्य करतात, नाले सफाईच्या बातम्या खोट्या आहेत, नाले सफाईमध्ये सुद्धा महानगरपालिकेचा धंदा आहे.

दरम्यान, कोरोना आणि पावसाने मुंबईकरांना परेशान केले आहे. तसेच पावसामुळे अनेक मृत्यू देखील मुंबईत होत आहे. तीन दुर्घटनांमध्ये २५ हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP