मुंबई महापालिकेने केले लसींचे दर जाहीर, वाचा सविस्तर

mumbai vaccine

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशातील १८ वर्षांवरील सर्व लोकांना मोफत लस दिली जाणार असल्याची घोषणा केली होती. शिवाय जे लोक खासगी रुग्णालयात पैसे देऊन लस घेऊ इच्छित आहेत अशांना सेवा शुल्क म्हणून १५० रुपयांपेक्षा अधिक रक्कम घेता येणार नाही, असेही जाहीर केले होते. राज्यांनी लस वाया जाऊ नये याची पुरती खबरदारी घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयांना कंपन्या थेट लसीचा पुरवठा करू शकतील, अशी सूटही देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईत लसीकरण मोहीम अधिक वेगाने करण्यात येणार आहे. यावेळी खासगी रुग्णालयाने लसींसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम वसुल करू नये म्हणून महापालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांसाठी लसींचं दरपत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार खासगी रुग्णालयात कोव्हिशिल्डसाठी 780 रुपये, कोव्हॅक्सिन 1410 रुपये, आणि स्पुतनिक व्हीसाठी 1 हजार 145 रुपये दर ठरवण्यात आले आहेत. त्यात 5 टक्के जीएसटी आणि 150 रुपये सेवा शुल्काचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच यापेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच केंद्र सरकारने २१ जूनपासून लागू होत असलेल्या राष्ट्रीय कोरोना लसीकरणाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यानुसार, केंद्र सरकार लसनिर्मात्या कंपन्यांकडून राज्यांच्या कोट्यातील २५ टक्केसह ७५ टक्के डोस स्वत: खरेदी करेल आणि राज्यांना मोफत देईल. हे वाटप लोकसंख्या, कोरोनाचे रुग्ण आणि लसीकरणातील प्रगती या आधारे केले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP