पूल कोसळण्याच्या घटनेस रेल्वेच जबाबदार; महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी हात झटकले

मुंबई: अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग आज सकाळच्या सुमारास कोसळला आहे, आता पूल कोसळण्याच्या घटनेवरून मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या पुलाची देखभाल करण्याची जबाबदारी रेल्वेची असल्याच म्हणत पूल कोसळण्याच्या घटनेस रेल्वेच जबाबदार आहे, असा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनजवळ पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे चर्चगेटहून विरारकडे जाणारी व विरारहून चर्चगेटच्या दिशेनं येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 वरील ही घटना आहे. आज सकाळी 7.35 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये २ जण जखमी झाले आहेत.

bagdure

दरम्यान, हा पूल मुंबई महापालिकेने बांधलेला असल्याने त्याची देखभाल महापालिकेनेच करणे अपेक्षित असल्याच, भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. तर हा पूल महापालिकेने जरी बांधला असला तरी त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असल्याच म्हणत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आपले हात झटकले आहेत.

पादचारी पुलाचा भाग रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यानं मुंबईत रेल्वे वाहतूक ठप्प

You might also like
Comments
Loading...