मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या थोरल्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

kishori pedanekar

मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे मोठे बंधू सुनिल कदम यांचा शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या सात दिवसांपासून सुनिल कदम यांच्यावर महापालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या एप्रिल महिन्यात महापौर किशोरी पेडणेकर या देखील होम क्वारंटाइन झाल्या होत्या. BMC च्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं होतं. महापौर किशोरी पेडणेकर या 14 दिवस घरीच होत्या. महापौर किशोरी पेडणेकर काही पत्रकारांच्या संपर्कात आल्या होत्या.

दरम्यान,कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंविस वाढत आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण संख्या आहे. एकट्या मुंबईसह उपनगरात कोरोनाचे 1 लाख 14 हजार 284 रुग्ण आहेत. त्यापैकी 87 हजार 074 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 6353 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सरकार या विषाणूला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र कुठेतरी हे प्रयत्न अपुरे पडत आहेत की काय असा देखील सवाल उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

‘राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये’

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळायलाच हवा… जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

सचिन सावंत यांनी ट्विटरवर केलेल्या आरोपांचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केले खंडन