मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात, पालिकेकडून १५ हजारांचा बोनस जाहीर

blank

टीम महाराष्ट्र देशा: येत्या दोन दिवसांत राज्यामध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे, तत्पूर्वी राजकीय आणि प्रशासकीय गोटामध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत. मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात होणार आहे.

मुंबई महापालिकेकडून दिवाळी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये दिले जाणार आहेत. यामुळे कर्मचारी आनंदीत आहेत. विधानसभेची आचारसंहिता केव्हाही जाहीर लागू होऊ शकते. त्यामुळे पुन्हा येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी बोनस देण्याची घोषणा आजच करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या निर्मित्ताने संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. या यात्रेचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक येथे होणार आहे. यावेळी भाजप विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. नाशिकमध्ये दुपारी 1 वाजता मोदींची सभा पार पडणार आहे. नाशिकमधील तपोवन परिसरात 20 एकरमध्ये या सभेसाठी भव्य मंच उभारण्यात आला आहे. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.