अर्णब गोस्वामींनी पैसे थकवले; इंटिरियर डिझायनरची आत्महत्या

mumbai-interior-designer-commits-suicide Fir registered against arnab goswami

टीम महाराष्ट्र देशा: ‘रिपब्लिक टीव्ही’चे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्याने एका इंटिरियर डिझायनरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अन्वय मधुकर नाईक (वय 52) असे इंटिरियर डिझायनरचे नाव असून त्यांनी अलिबागजवळील कावीर येथे राहत्या घरी आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे अन्वय नाईक यांच्या आईचा मृतदेह हि घरात सापडल्याने घटनेने नवीनच वळण घेतले आहे.

अन्वय नाईक यांचा ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ नावाने मुंबईमध्ये इंटिरियर डिझायनींगचा व्यवसाय आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास नाईक यांचा मृतदेह घरातील नोकरांना लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर त्यांच्या आईंचा मृतदेह ही तिथेच होता. घटनास्थळावर पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली आहे. यामध्ये अर्णब गोस्वामी तसेच आयकास्ट स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, ‘स्मार्ट वर्क्स ’चे नितेश सारडा या तिघांनी पैसे थकवल्याच लिहील आहे. त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याच या चिठ्ठीत सांगण्यात आल आहे.

दरम्यान, नाईक यांच्या पत्नीने अलिबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 Comment

Click here to post a comment