यावर्षी मुंबई इंडियन्सचं जिंकणार ‘या’ दोन दिग्गजाची भविष्यवाणी!

मुंबई इंडियन्स

मुंबई : आजपासून आयपीएलचा ‘रन’संग्राम सुरु होणार आहे. आयपीएलच्या 14 पर्वाला आज पासून सुरुवात होत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील यशानंतर भारतीय खेळाडू देशातील लोकप्रिय असलेल्या आयपीएलसाठी सज्ज झालेत. आजचा पहिला सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर  यांच्यात होणार आहे. आज साडे सात वाजता चेन्नईच्या चिन्नास्वामी मैदानावरुन या सामन्याला सुरुवात होईल.

या मोसमातही मुंबईची टीम भक्कम असून पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यासाठीची प्रबळ दावेदार आहे. यंदाची आयपील ट्रॉफी जिंकुन मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये हॅटट्रीक साधण्याच्या दृष्टीने उतरणार आहे. आणि कर्णधार रोहित शर्माही यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.

यावर्षीही मुंबलाई हरवणं बाकीच्या संघांना फार अवघड जाणार आहे. कारण यावर्षीही मुंबईची टीम भक्कम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यावेळीही मुंबई इंडियन्स विजेती होणार असल्याचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी सांगितलं आहे. त्यांच्याअगोदर भारताचे दिग्गज माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनीही मुंबई इंडियन्स 2021 च्या पर्वातील विजेता संघ असेल, अशी भविष्यवाणी केली होती.

गतविजेता मुंबई इंडियन्सची टीम यंदाच्या आयपीएल 2021 च्या हंगामाची विजेती असेल. काही कारणामुळे जर मुंबई जिंकू शकली नाही तर यंदाची आयपीएल ट्रॉफी सनराजर्स हैदराबाद जिंकेन, अशी भविष्यवाणी मायकल वॉन यांनी केलीय.

महत्त्वाच्या बातम्या :