मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी ; आजपासून रंगणार आयपीएलचा थरार

mi vs rcb

चेन्नई : आयपीएलच्या 14 पर्वाला आज पासून सुरुवात होत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील यशानंतर भारतीय खेळाडू देशातील लोकप्रिय असलेल्या आयपीएलसाठी सज्ज झालेत. आजचा पहिला सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर  यांच्यात होणार आहे. आज साडे सात वाजता चेन्नईच्या चिन्नास्वामी मैदानावरुन या सामन्याला सुरुवात होईल.

या मोसमातही मुंबईची टीम भक्कम असून पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यासाठीची प्रबळ दावेदार आहे. यंदाची आयपील ट्रॉफी जिंकुन मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये हॅटट्रीक साधण्याच्या दृष्टीने उतरणार आहे. आणि कर्णधार रोहित शर्माही यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात अव्वल खेळाडू  उपस्थिती असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजेतापद मिळवता आलेले नाही. या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जिकंण्याच्या वृत्तीने मैदानात उतरणार आहे. आरसीबीने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनला सामील करून घेतले आहे. त्यामुळे आता आरसीबी संघ देखील भक्कम असल्याचे दिसत आहे.

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील सलामीचा सामना आज चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार सामन्याला ठीक 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील पहिल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या :