मुंबई इंडियन्सचा आज मुंबईत ‘व्हिक्टरी मार्च’

टीम महाराष्ट्र देशा : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्यांदा आयपीएलचा विजेता ठरला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईवर थरारक विजय मिळवला. विजेतेपद सेलिब्रेट करण्यासाठी मुंबईमध्ये आज  संध्याकाळी व्हिक्टरी मार्च काढणार आहेत.

Loading...

मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया (त्यांच्या निवासस्थानाचे नाव) ते पंचतारांकित हॉटेल ट्रायडंटपर्यंत व्हिक्टरी मार्च होणार आहे. ओपन बसमध्ये मुंबई इंडियन्स संघातील सर्व खेळाडू चषकासह चाहत्यांना अभिवादन करतील. यावेळी बुमराह, रोहित शर्मा, मलिंगा यांना पाहण्यासाठी चाहत्यांना संधी मिळणार आहे.Loading…


Loading…

Loading...