मुंबई इंडियन्सचा दमदार शिलेदार अर्जुनाचा जीममध्ये कसून सराव; व्हिडीओ जोरदार व्हायरल 

arjun

दुबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केला. यामुळे बीसीसीआयला ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगीत करावी लागली. यानंतर काही दिवसातच उर्वरीत स्पर्धा युएई येथे आयोजीत करण्याची घोषणा बीसीसीआयने केली होती.

काही दिवसातच बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करत येत्या १९ सप्टेंबरपासुन आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत असल्याची माहिती दिली. आयपीएलसाठी आता सर्व संघ यूएईत दाखल झाले आहेत.  आयपीएलसठी फक्त काहीच दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे आयपीएलच्या या भव्य स्पर्धेसाठी सर्वच खेळाडू जोरदार तयारी करताना दिसत आहेत.

यात स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचा खेळाडू आणि सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही जोरदार सराव करताना दिसत आहे. नुकताच मुंबई इंडियन्सने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये संघाचे सर्व खेळाडू जीममध्ये सराव करताना दिसत आहेत.  इशान किशन, राहुल चहर, धवल कुलकर्णी, जयंत यादवसह पियुष चावला हे खेळाडू दिसत आहे. पण यामध्ये युवा खेळाडू अर्जून तेंडुलकर मात्र उठून दिसत आहे. तसेच अर्जुनाचा हा सरावाचा व्हिडीओ पाहून सर्वजण प्रभावित झाले आहेत. या व्हिडीओला मागे बेजुबान गाणंही लावलं आहे.

आयपीएल २०२१च्या लिलावात अर्जुनला मुंबई इंडियन्सने त्याच्या मुळ किमतीत खरेदी केले होते. मात्र स्पर्धेत त्याला संधी मिळाली नव्हती. कारण मुंबईच्या संघात एकापेक्षा एक सरस गोलंदाज आहेत. त्यामुळे त्याची खेळण्याची शक्यता कमीच होती. यामुळे अर्जुनने फलंदाजीचा देखील सराव सुरु केला असल्याचे समजले होते. आयपीएल २०२१चा उर्वरीत हगांमातील पहिला सामना हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघादरम्यान आहे.

महत्वाच्या बातम्या