मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी ऑनलाईन साजरं केलं रक्षाबंधन ; सारानेही दिल्या अर्जून तेंडुलकरला शुभेच्छा

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी ऑनलाईन साजरं केलं रक्षाबंधन ; सारानेही दिल्या अर्जून तेंडुलकरला शुभेच्छा

arjun tendulkar

मुंबई : लहान बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आनंद देणारा रक्षाबंधनाचा सण देशभरात विविध नावांनी प्रसिद्ध आहे. या दिवशी बहिण भावाला ओवाळून राखी बांधते. रक्षाबंधन हा उत्सव दरवर्षी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अलीकडे तर लांब असणारे भाऊ-बहिणही व्हिडीओ कॉलिंगद्वारे हा सण साजरा करतात. अशीच काहीशी शक्कल मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी लढवली आहे. सध्या आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत पर्वासाठी युएईला असणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी त्यांच्या बहिणींनी व्हिडीओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

यामध्ये अर्जून तेंडुलकर देखील त्याची बहिण सारासोबत व्हिडीओ कॉलवर एकमेंकाना शुभेच्छा देत आहे. याशिवाय यष्टीरक्षक आदित्य तारे, बॅट्समन अनमोलप्रीत सिंग आणि बोलर युधवीर सिंग हेही आपल्या बहिणींसोबत व्हिडीओ कॉलवर आपला रक्षाबंधन साजरा केला.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केला. यामुळे बीसीसीआयने ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगीत करावी लागली. यानंतर काही दिवसातच उर्वरीत स्पर्धा युएई येथे आयोजीत करण्याची घोषणा बीसीसीआयने केली. या स्पर्धेला 19 सप्टेंबरपासून  सुरुवात होणर आहे.

महत्त्वाच्या बातम्या