‘मुंबई इंडियन्स नाही तर ‘या’ संघाकडे आयपीएल 2021 चे विजेतेपद जिंकण्याची मोठी संधी’ 

mumbai indians

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील उर्वरित सामने या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. स्पर्धेचे उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहेत. क्रिकेट फॅन्समध्ये आता आयपीएलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यावेळी यूएईमध्ये प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार असल्यानं त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

दरम्यान, आयपीएलच्या अगोदरच कोणता संघ आयपीएल विजेता होणार याबाबत इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार केविन पीटरसन यांनी भविष्यवाणी केली आहे. केविन पीटरसन म्हणाले की, ‘मुंबई इंडियन्स या मोसमाच्या दुसऱ्या सहामाहीत संथ प्रारंभाची जोखीम घेऊ शकत नाही. त्याचबरोबर, एसएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला 2020 च्या खराब हंगामानंतर जेतेपद जिंकण्याची मोठी संधी आहे. जेव्हा आयपीएल 2021 मध्यभागी पुढे ढकलण्यात आली, तेव्हा दिल्लीचा संघ पहिल्या क्रमांकावर होता, तर सीएसके दुसऱ्या, आरसीबी तिसऱ्या आणि मुंबईचा संघ चौथ्या क्रमांकावर होता.

पीटरसनने ‘बेटवे डॉट कॉम’ वर आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले, ‘स्पर्धेतील गतविजेत्या मुंबई इंडियन्सने चांगली कामगिरी करावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असेल परंतु त्यांचा सुरुवातीपासूनच शीर्षस्थानी राहण्याचा इतिहास नाही. ते आधी काही सामने गमावतात आणि नंतर स्पर्धेच्या शेवटी चांगली कामगिरी करून परत येतात, पण आता आम्ही आधीच स्पर्धेच्या समाप्तीच्या दिशेने जात आहोत आणि मुंबई संघ तीन किंवा चार सामने गमावू शकत नाही कारण नंतर परत येण्यासाठी खूप कमी वेळ असेल.

‘जर त्यांना त्यांच्या जेतेपदाचा बचाव करायचा असेल तर त्यांना पहिल्या चेंडूवरच दबाव निर्माण करावा लागेल. हे स्पष्ट आहे की त्यांची प्रतिभा लक्षात घेता, ते हे करण्यास सक्षम देखील आहेत. ‘चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला ‘डॅड्स आर्मी’ असेही म्हटले जाते कारण संघातील बहुतेक खेळाडूंनी वयाची 30 वर्षे ओलांडली आहेत. तसेच पीटरसनला वाटते की यावेळी धोनीचा संघ धमाल करू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या