चेन्नईच्या अंबाती रायडुने फोडले मुंबई इंडियन्सचे फ्रिज; व्हिडीओ व्हायरल

दिल्ली : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या लढतीत मुंबईने ४ गडी राखुन सीएसकेचा पराभव केला. सीएसकेने दिलेल्या २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीपणे करत ४ गडी राखुन मात केली. वादळी अर्धशतकासाठी मुंबईच्या कायरान पोलार्डला सामनावीराच्या पुरस्कारनाने सन्मानीत करण्यात आले.

सामनच्या पहिल्या डावात चेन्नईच्या फलंदाजानी धमाकेदार कामगीरी करत २१८ धावांचा डोगंर उभारला. यात मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडूने २७ चेंडुत ४ चौकार आणि ७ षटकाराच्या मदतीने ७२ धावांची वादळी खेळी केली. पहिल्या डावातील एकोणिसावे षटक हे जमप्रीत बुमराह टाकत होता. या षटकात रायडूने लॉंग ऑफच्या दिशेने एक फटका मारला. तो फटका हा सिमापार जात थेट मुंबई डगआऊटमधील फ्रिजच्या काचेवर आदळला. आणि ती काच फुटली.

यापुर्वी याच स्पर्धेत मुंबईविरुद्धच सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोने अशाच प्रकारे एक फटका खेळत डग आऊटमधील फ्रिज फोडला होता. चेन्नईने दिलेल्या २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने ४ गडी राखुन विजय मिळवला. कायरन पोलार्डने ३४ चेंडूत ८ षटकार आणि ६ चौकारांसह नाबाद ८७ धावा करत अखेरच्या चेंडूवर हे आव्हान पूर्ण करत सामना जिंकला. मुंबईचा हा या हंगामातील चौथा विजय ठरला.

महत्वाच्या बातम्या

IMP