हार्दिक – नताशाला मुंबई इंडियन्सच्या हटके शुभेच्छा

Hardik - Natasha

मुंबई : लॉकडाउन काळात भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर गुरूवारी (दि.३०) पुत्ररत्न झाले. हार्दिक-नताशा आई-बाबा झाल्याचे हार्दिकने स्वत: ट्विट करून सांगितलं.  गुरूवारी दुपारी हार्दिकने बाळाच्या हातात आपला हात असल्याचा गोंडस फोटो पोस्ट करत साऱ्यांना ही गोड बातमी सांगितली.

या गोड बातमीनंतर सोशल मीडियावर हार्दिक-नताशा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. मुंबई इंडियन्सनंही या जोडीचं कौतुक केलं, परंतु त्यांनी तयार केलेलं पांड्या कुटुंबीयांचं कार्टुन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट करत त्याने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याला ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. आई-बाबा झालेल्या हार्दिक-नताशाचं मन:पूर्वक अभिनंदन असं म्हणत त्याने नताशा-हार्दिकचे अभिनंदन केले.

दरम्यान, 2020 वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यानं नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा करण्याचे जाहीर केले. त्यानंतर दोघांनी वर्षाच्या सुरुवातीला दुबईत मोजक्याच मित्रांच्या साक्षीनं साखरपुडा केला. हार्दिकनं ही बातमी सोशल मीडियावरून सर्वांना सांगितली. गेल्या महिन्यात नताशा प्रेग्नंट असल्याचे जाहीर करून गुपचूप लग्नही उरकले. बाप होण्याची जबाबदारी खांद्यावर आल्यापासून हार्दिक जबाबदार झाल्याचे पाहायला मिळत आहे.

बॉक्सर माईक टायसन पुन्हा एकदा रिंगमध्ये उतरणार

राफेल विमानांचं भारतीय भूमीवर आगमन!

मास्क वापरा हा संदेश देण्यासाठी मार्क झुकरबर्ग यांनी ठेवला खास फोटो