नाद खुळा : मुंबई इंडियन्स बनला टी २० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान संघ

mumbai indies

नवी दिल्ली – मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. विस्डन आणि क्रिकविझ यांनी संयुक्तपणे ‘द ग्रेटेस्ट टी २०’ पॉडकास्ट आयोजित केला होता. या पॉडकास्टमध्ये IPL मधील मुंबई इंडियन्सचा संघ टी २० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान संघ ठरला आहे.

या पॉडकास्टमधील क्रिकेट तज्ञ्जांच्या पॅनलने हा निर्णय घेतला. या पॅनलमध्ये वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन गंगा, क्रीडा पत्रकार फ्रेडी विल्ड आणि पॉडकास्टचा अँकर यांचा राणा यांचा समावेश होता. विविध टी २० लीगमधील संघांचा यामध्ये विचार करण्यात आला. संघातील विविध गोष्टींचा विचार करूनच मुंबई इंडियन्सच्या संघाची निवड करण्यात आली.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. परंतु, सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा श्रीलंकेत होऊ शकेल असे भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना वाटते त्यामुळे जर ही स्पर्धा झाली तर मुंबई इंडियन्सचा जलवा पुन्हा पाहायला मिळणार आहे.

#व्यक्तिविशेष : चे गव्हेरा- जगभरातल्या क्रांतिकारकांचा आणि युवकांचा आदर्श

ठरलं तर मग…’हा’ नेता असणार बिहारच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

भाजपनेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची तब्ब्येत अचानक बिघडली, हॉस्पिटलमध्ये केलं अॅडमिट