‘एक नारल दिलाय दर्यादेवाला’ ट्रेंडिंग गाण्यावर मुंबई इंडियन्सचा भन्नाट डान्स ; पहा व्हिडीओ

मुंबई इंडियन्स

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील यशानंतर भारतीय खेळाडू देशातील लोकप्रिय असलेल्या आयपीएलसाठी सज्ज झालेत. येत्या ९ एप्रिल पासुन आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. यावर्षीचा आयपीएलचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर  यांच्यात होणार आहे. या मोसमातही मुंबईची टीम भक्कम असून पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यासाठीची प्रबळ दावेदार आहे. यंदाची आयपील ट्रॉफी जिंकुन मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये हॅटट्रीक साधण्याच्या दृष्टीने उतरणार आहे. आणि कर्णधार रोहित शर्माही यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच सगळे संघ तयारी करताना दिसत आहेत. नेट्समध्ये घाम गळताना दिसत आहेत. प्रॅक्टिसचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ प्रॅक्टिसचा नसून डान्स करतानाचा आहे.

मुंबईचे खेळाडू सध्या सोशल मीडियावरील ट्रेंडिंग गाणे ‘एक नारल दिलाय दर्यादेवाला’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यांचा हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या इंस्टग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या गाण्यावर संघाचा कर्णधार रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, पंडय़ा बंधू ठेका धरताना दिसतायत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाखाहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे.

महत्वाच्या बातम्या