आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्या एकुलता एक मुलाची आत्महत्या

manmath mhaiskar ias manisha mhiaskar son

मुंबई : ज्येष्ठ आयएएस अधिकारी मिलिंद म्हैसकर आणि नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांचा मुलगा मन्मथ म्हैसकर (वय २२) याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे  . मलबार हिलमधील दरिया महल या इमारतीवरुन  उडी मारुन मन्मथ याने आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

मन्मथ हा मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास मित्राला भेटण्यासाठी जातो सांगून घरातून निघाला होता. सकाळी साडे सातच्या सुमारास नेपियन्सी रोडवरील दरिया महल या इमारतीमधून एका मुलाने उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता आत्महत्या करणारा तरुण म्हैसकर दाम्पत्याचा मुलगा असल्याचे समोर आले आहे . मन्मथ हा म्हैसकर दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता.