वेळ पडल्यास डीएसकेंनी भीक मागावी पण पण कोर्टात पैसे भरावेत – हायकोर्ट

डीएसके

टीम महाराष्ट्र देशा : गुंतवणूकदारांचे पैसै देण्यासाठी वेळ पडल्यास डीएसकेंनी भीक मागावी, पण कोर्टात पैसे भरावेत, अस आज मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना सुनावलं आहे. ५० कोटींची रक्कम जमा करण्यास डीएसके आज पुन्हा एकदा अपयशी ठरल्यानंतर हायकोर्टाने ही याबाबत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. तसंच येत्या 13 डीएसकेंनी स्वतः हायकोर्टात हजर राहावं, असे निर्देशही हायकोर्टाने दिलेत.

Loading...

डीएसकेंबाबत सरकारच्या भूमिकेबद्दलही कोर्टाने शंका उपस्थित केली. सरकार डीएसकेंबद्दल फक्त कायदी घोडे नाचवत असल्याचं मत हायकोर्टाने नोंदवलं, डीएसकेंच्या प्रभावामुळे जर तुमचे अधिकारी कारवाई करत नसतील तर हे त्या अधिका-यांचं वर्तन हे लाजिरवाणे आहे, डीएसके नेमक्या कोणत्या तारखेला कोर्टात हजर राहतील ते उद्याच सांगा. मात्र येताना रिकाम्या हातानं येऊ नका, उसने घ्या, भीक मागा, काहीही करा पण लोकांचे पैसे परत करा, अशा शब्दात हायकोर्टाने सरकारला फटकारलंय.Loading…


Loading…

Loading...