डी. एस. कुलकर्णींचा आज फैसला ?

डीएसके

टीम महाराष्ट्र देशा: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. सुनावणीसाठी पत्नी हेमांगींसह हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश डीएसकेंना कोर्टाने दिले आहेत. डीएस कुलकर्णींवर गुंतवणुकदारांचे पैसे थकवल्याचा आरोप आहे. त्यामुळे डीएसकेंच्या प्रकरणात आज मुंबई हायकोर्टात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

येताना रिकाम्या हातानं येऊ नका, पैसे उसने घ्या, भीक मागा, काहीही करा, लोकांचे पैसे कधी परत करणार याची माहिती द्या, असंही हायकोर्टानं बजावलं होतं. त्यानंतर क्राऊड फंडिंग करुन पैसे उभारण्याचा प्रयत्न डीएसकेंकडून सुरु आहे.

तुम्हाला कोठडीत पाठवण्यास आम्हाला एक क्षणही पुरेसा आहे. तुम्ही स्वत:ची अवस्था सहाराप्रमाणे करुन घेऊ नका, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना झापलं होतं. डीएसकेंना कोठडीत पाठवून लोकांना त्यांचे पैसे परत मिळणार नाहीत, अशी खंतही कोर्टाने व्यक्त केली होती.