स्वत:ची अवस्था सहाराप्रमाणे करुन घेऊ नका ; हायकोर्टाने डीएसकेंना झापलं

टीम महाराष्ट्र देशा: तुम्हाला कोठडीत पाठवण्यास आम्हाला एक क्षणही लागणार नाही’ तुम्ही स्वत:ची अवस्था सहाराप्रमाणे करुन घेऊ नका, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना झापलं आहे. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी जामिनाची रक्कम भरण्यात पुन्हा अपयशी ठरले आहेत. यावर मुंबई हायकोर्टाने त्यांना झापलं आहे.

डीएसकेंच्या खात्यात पैसे जमा करणारे अरविंद प्रभुणे यावेळी कोर्टात हजर होते.डीएसकेंच्या खात्यात 51 कोटी जमा केल्याची हमी प्रभुणे यांनी जातीनं हायकोर्टात हजर राहून दिली. एक फेब्रुवारीपर्यंत बँक ऑफ बडोदामध्ये पैसे जमा करण्याची डीएसकेंकडून हमी घेण्यात आली आहे. डीएसकेंना कोठडीत पाठवून लोकांना त्यांचे पैसे परत मिळणार नाहीत, अशी खंतही कोर्टाने व्यक्त केली. तूर्तास तरी डीएसकेंना पाच फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून असलेला दिलासा मिळाला आहे.

You might also like
Comments
Loading...