राष्ट्रवादी नगरसेवक दीपक मानकर यांना धक्का, उच्च न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन

जामीन नाकारल्याने कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता 

मुंबई: जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेस नगरसेवक दीपक मानकर  यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे मानकर यांच्या अडचणीत आणखीन  वाढ झाली आहे.  तर कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात दिपक मानकर यांच्यासह विनोद भोळे, सुधीर सुतार, अमित तनपुरे, अतुल पवार, विशांत कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आधी पोलिसांनी मानकर यांच्या इतर साथीदारांना अटक केली होती.  मानकर यांच्यावर गुन्हा दाखल  झाल्यापासून  गायब होते. दरम्यान, आता उच्च न्यायालयाने अटकपूर्व जमीन नाकारल्याने मानकर यांना जोरदार धक्का मानला जात आहे.