पालिका आयुक्तांना तुरुंगात टाकल्याशिवाय सुधारणा होणार नाही – उच्च न्यायालय

मुंबई : सण उत्सवातील बेकायदेशीर मंडपावरुन मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिका आणि मुंबई महापालिकेची चांगलीच कानउघडणी केली आहे. एखाद्या पालिका आयुक्ताला तुरुंगामध्ये टाकल्याशिवाय कायद्याची अंमलबजावणी होणार नाही, असेही उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान म्हटले आहे.

bagdure

मंडपांसंबंधी ही जनहित याचिका ठाण्यातील सामाजिक कर्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशांनंतरही यंदा नवी मुंबईत 62 मंडप बेकायदेशीररित्या बांधण्यात आले होते. त्यामुळे नवी मुंबई महापालिका आयुक्त एम. रामास्वामी यांना अवमान केल्याबद्दल नोटीस जारी करण्यात आली.

You might also like
Comments
Loading...