मुंबई हायकोर्टाकडून बैलगाडी शर्यतीला लगाम

bulak cart race maharashtra

राज्य सरकारने राज्यात बैलगाडी शर्यती सुरु करण्याबाबत अधिसूचना काढली असली तर स्पर्धे दरम्यान बैलांना इजा होणार नाही या विषयी कोणतीही नियमावली बनवलेली नाही. याचवरून आता राज्य सरकार जोपर्यंत नियमावली कोर्टासमोर सादर करत नाही तोपर्यंत बैलगाडी स्पर्धेसाठी परवानगी देण्यास मुंबई हायकोर्टानं मनाई केली आहे त्यामुळे यंदा राज्यात कोठेही या स्पर्धांच्या आयोजनाची परवानगी देण्यास मनाई करण्यात आली आहे..

राज्य सरकारनं बैलगाडी स्पर्धासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका अजय मराठे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ असून यामध्ये बैलांना इजा होत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान २ आठवड्यांत राज्य सरकारला यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत