रिपाई महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक निकाळजेवर बलात्कार केल्याचा आरोप

दीपक निकाळजे गँगस्टर छोटा राजनचा भाऊ

टीम महाराष्ट्र देशा- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक निकाळजे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाच्या आमिषाने निकाळजे यांनी वारंवार बलात्कार केल्याचा आरोप नवी मुंबईतील घणसोली भागात राहणाऱ्या 22 वर्षीय युवतीने केला आहे. विशेष म्हणजे दीपक निकाळजे गँगस्टर छोटा राजनचा भाऊ आहे.

bagdure

काय आहे नेमकं प्रकरण ?
युवतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 2014 मध्ये ती कुर्ला येथे आपल्या मामाकडे आली असताना दीपक निकाळजेंची तिच्यावर नजर पडली. तिच्या कुटुंबासोबत लगट करुन, तिला पैसे आणि लग्नाचे आमिष निकाळजेंनी दाखवले. कर्जत येथील एका फार्म हाऊसवर आपल्या ऑडी कारमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.या मुलीने लग्नाची मागणी केली असता तिला मारहाण सुद्धा करण्यात आली. पोलिस तक्रार करु नये म्हणून दीपक निकाळजेची बहीण आणि मेहुण्याने दबाव आणल्याचा आरोपही तक्रारदार युवतीने केला आहे. तरुणीने टिळकनगर पोलिसात 18 मार्चला तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन जिथे हा प्रकार घडला त्या नवी मुंबईतील परिमंडळ 2 कडे वर्ग केला आहे, अशी माहिती टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय खैरे यांनी दिली आहे.

You might also like
Comments
Loading...