उस्मानाबाद जिल्हयात मुंबई पुर्ण रिर्टन कोरोना बाधीतांचा कहर

labours

तुळजापूर – कोरोनाने आता ग्रामीण भागात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. उस्मानाबाद जिल्हयातील 11 जणांचे अहवाल बुधवार दि27रोजी प्राप्त झाले असून यामध्ये 7 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर दोघांचे अहवाल संदिग्ध असून दोघे निगेटिव्ह आहेत.

बुधवारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये दोघेजण जेवळी (ता.लोहारा) येथील असून तिघेजण कार्ला (ता.तुळजापूर) येथील असून तिघेही नवी मुंबईहून आलेले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील धुत्ता येथे आणखी एक व्यक्ती कोरोनाबाधित असून मुंबईहून परत आलेली आहे.

केसरजवळगा (ता.उमरगा) येथेही एक कोरोनाबाधित आढळला असून तो यापूर्वीच्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या आता 50 वर गेली आहे. यापैकी 8 जणांना उपचाराने बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलेले आहे. तर 42 जणांवर उपचार सुरू आहेत.

एकाचवेळी २८ पोलिसांनी केली कोरोनावर मात, आरोग्यमंत्री टोपेंच्या उपस्थित दिला डिस्चार्ज

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील दीक्षांत संचलन सोहळ्याला पालकांना मुकावे लागणार

प्राजक्त तनपुरेंनी राणेंना पुन्हा डिवचले; म्हणाले लहान मुलांकडं दुर्लक्ष करायचं असतं