जमिनीच्या मोबदल्यासाठी आणखी एका शेतकऱ्याचा मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा इशारा !

MANTRALAY mumbai maharashtra

टीम महाराष्ट्र देशा : काही दिवसांपूर्वी धर्मा पाटील या ८४ वर्षीयशेतकऱ्याने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या केबिनबाहेरच विषप्राशन केल आणि उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने राज्यभर असंतोषाची लाट उसळली आहे. या शेतकऱ्याच गाऱ्हाणं होत ते प्रकल्पात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्याच. आता अजून एक असाच शेतकरी समोर आला आहे. आता लातूर जिल्ह्यातील संतोष चरपले (४०) या शेतकऱ्याने जमिनीच्या मोबदल्यासाठीच २१ मार्च रोजी आत्मदहन करण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

Loading...

चरपले यांची जमीन सुपीक आहे. ही जमीनही प्रकल्पात गेली असून त्यांना उत्पन्नाचे दुसरे कुठलेही साधन उरलेले नाही. विशेष म्हणजे ज्यांची जमीन सुपीक नाही किंवा ज्यांच्या शेतात पाणी थांबत नाही त्यांना जमिनीच्या मोबदल्याचे वाटप करण्यात आलेले आहे. याप्रकरणी तत्काळ चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी चरपले यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली असून न्याय मिळाला नाही तर २१ मार्च रोजी मंत्रालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

लातूर जिह्यातील धनेगाव या ठिकाणी चरपले यांची २ हेक्टर ५२ गुंठे इतकी जमीन आहे. या ठिकाणी धरण बांधण्यात येणार असून त्यासाठी संपादित जमिनींमध्ये चरपले यांचीही जमीन आहे. २०१४ रोजी येथील जमिनी संपादित करण्यात आल्या. या जमिनीचा सरकार हेक्टरी २२ लाख मोबदला देणार होते, परंतु आजतागायत चरपले यांना मोबदला मिळालेला नाही.

नवीन आत्महत्या केंद्र ठरलेल्या मंत्रालयात आत्महत्या रोखण्यासाठी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. पण जाळ्या लाऊन आत्महत्या रोखण्यात सरकारला यश येईल का ? आणि मुख्य मुद्दा म्हणजे जाळ्या लावणे हा उपाय करून आत्महत्या थांबतील हे नक्की कोणत्या मंत्र्यांच्या डोक्यात आला हा खरा संशोधनाचा विषय आहे.

१० नोव्हेंबर २०१७ पासून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

१० नोव्हेंबर २०१७ – ज्ञानेश्वर साळवे, तुळजापूर
हा तरुण शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील छतावर चढला होता.

२२ जानेवारी २०१८ – धर्मा पाटील, धुळे
या ८४ वर्षीय शेतकऱ्याने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या केबिनबाहेरच विषप्राशन करून आत्महत्या केली.

२ फेब्रुवारी २०१८ – मारुती धावरे, सोलापूर
हा २८ वर्षीय शेतकरी आत्महत्या करण्यासाठी कीटकनाशक घेऊन मंत्रालयात गेला होता, परंतु त्याचा प्रयत्न फसला.

७ फेब्रुवारी २०१८ – अविनाश शेटे, नगर
या तरुणाने मंत्रालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

८ फेब्रुवारी २०१८ – हर्षल रावते, चेंबूर
चेंबूरमधील हर्षल रावते या तरुणाने तुरुंगवासाची शिक्षा कमी करीत नाही म्हणून नैराश्य आल्याने थेट पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.Loading…


Loading…

Loading...