शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; तीन बड्या नेत्यांचं निलंबन

udhav thakare

मुंबई : शिवसेनेच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. या नेत्यांमधील दुफळीचा फटका पक्ष संघटीकरणाला बसत असल्यामुळे, उद्धव ठाकरे यांनी अशा नेत्यांविरोधात ठोस भूमिका घेत, त्यांचं निलंबन केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील तीन बड्या नेत्याचं निलंबन केलं आहे. जगदीश शेट्टी, दीपक सावंत आणि दत्ता दळवी अशी या तीन नेत्यांची नावं आहेत. यामुळे आता अंतर्गत दुफळी माजवणाऱ्या नेत्यांवर चाप बसणार आहे.

या नेत्यांपैकी दत्ता दळवी हे मुंबईचे माजी महापौर आहेत. तसेच ते ईशान्य मुंबई विभाग क्रमांक ७ चे विभागप्रमुख आहेत. त्यांनी आपल्या वयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचं सांगतात मात्र या सर्व नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी निलंबित केल्याची चर्चा आहे.

राज्यपालांप्रमाणे मुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती करा – उद्धव ठाकरे

‘सावजाची शिकार मीच करीन’ – उद्धव ठाकरे