मुंबईची विमानसेवा सुरु ; मात्र रेल्वेसेवा अजूनही बंदच

Mumbai flight started

मुंबई –  जोरदार पाऊस आणि खराब हवामानामुळे बंद करण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील विमान सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले . साडे चार वाजण्याच्या सुमारास कमी दृश्यमानतेमुळे विमान सेवा थांबवण्यात आल्याचे विमानतळ प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात आले होते .

सकाळपासून जोरदार पाऊस , वेगाने वाहणारे वारे या मुळे अनेक विमाने मुंबई विमानतळावर उतरू शकली नाहीत . या पैकी काही विमानांचा मार्ग बदलण्यात आल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले . पश्चिम , मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा बंदच आहे . अजूनही अनेक ठिकाणी रेल्वे मार्गांमध्ये पाणी साठले आहे .