ईडीतर्फे छापेमारी, कोट्यावधींचा काळापैसा पांढरा केल्याचा संशय

मुंबईच्या झवेरी बाजार परिसरातील चार सराफा व्यापाऱ्यांच्या कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) छापे टाकण्यात आले. या व्यापाऱ्यांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून खोटे व्यवहार दाखवून कोट्यावधींचा काळा पैसा पांढरा केल्याचा संशय आहे.

‘ईडी’ने शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. यानिमित्ताने झवेरी बाजारात काळा पैसा पांढरा करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचेही उघडकीस आले असून ईडीने या सराफांची झाडाझडती सुरू केली आहे. सध्या येथील एकूण सहा कंपन्यांचा ईडी तपास करत आहे.

खोट्या कंपन्या दाखवत खोट्या अकाऊंटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यात आले आहेत. खोटे ट्रान्झॅक्शन दाखवत जमा केलेली कोट्यावधींची रक्कम ईडीकडून गोठवण्यात आली आहे. सध्या येथील एकूण सहा कंपन्यांचा ईडी तपास करत आहे.