पावसाचा जोर ओसरल्याने मुंबई हळूहळू पूर्वपदावर

Mumbai due to rain fall

मुंबई – पावसाचा जोर मंगळवारी रात्रीपासून ओसरल्याने मुंबईचे जनजीवन अत्यंत संथ गतीने पूर्वपदावर येऊ लागले आहे . पश्चिम रेल्वेची वाहतूक काही अंशी सुरळीत होऊ लागली आहे . मात्र मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही पूर्णपणे बंद आहे .

परळ, सायन येथे सखल भागात अजूनही पाणी साठले असल्याने येथील रस्त्यावरील वाहतूक पूर्णत: सुरु होऊ शकलेली नाही. दादर , कुलाबा , प्रभादेवी या सारख्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर पाणी तुंबल्याने रस्ते वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला होता.