मुंबईच्या डबेवाल्यांना अभियंत्याने घातला कोटी रूपयांचा गंडा

MUMBAI DABBAWALA

मुंबई  : मुंबई डबेवाल्यांच्या संघटनेचे संकेतस्थळाची जबाबदारी सांभाळणा-या एका अभियंत्याने डबेवाल्यांना तब्बल एक कोटी रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या मुंबईच सुमारे पाच हजारांहून अधिक डबेवाले आहेत.

दररोज हे डबेवाले दोन लाख चाकरमान्यांचे डबे त्यांच्या कार्यालयात पोहोचवतात. अधिकतर हे डबेवाले निरक्षर आहेत. त्यामुळे या अभियंत्याने या गोष्टीचा फायदा घेत डबेवाल्यांना एक कोटींचा गंडा घातला. मुंबईच्या डबेवाल्यांची ओळख जगभरात पोहोचली आहे. त्यामुळे डबेवाला संघटनेला परदेशामधूनही प्रसिद्धीची कामे येतात. या अभियंत्याने एक बनावट कंपनी स्थापन करून ती कामे आपल्याकडे परस्पर वळवली होती.

Loading...