परळमधील क्रिस्टल टॉवरला आग, २ जणांचा मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा :   परळमधील क्रिस्टल टॉवरच्या 12 व्या मजल्याला आग लागल्याची घटना आज सकाळी 9:30 च्या सुमारास घडली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. इमारतीत अडकलेल्या १० ते १२ जणांची सुटका करण्यात आली आहे. तर यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. आग कशामुळे लागली हे अजूनही समजू शकलेले नाही.

शॉर्टसर्किटमुळे काही कर्मचारी इमारतीत अडकल्याचे वृत्त असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत, काळाच्या पडद्याआड